pallavikelkar

माझी पुण्यातली सर्वात आवडती हॉटेलं

In Marathi on May 26, 2010 at 2:30 pm

मला खाण्याची (आणि बनवण्याचीसुद्धा) खूप आवड आहे. माझी पुण्यातल्या बरीचशा हॉटेलांना भेट देऊन झाली आहे. त्यांपैकी माझी सर्वात आवडती-

*मी अजूनतरी फक्त शाकाहारी आहे. त्यामुळे तशीच हॉटेलं दिली आहेत

१. किमलिंग: हे चायनीज हॉटेल लुल्लानगर सिग्नलच्या चौकात, गेरा जंक्शन नावाच्या ईमारतीत, झेड केज या हॉटेलच्या diagonally opposite आहे. ह्या हॉटेलमधले जवळजवळ सर्व शाकाहारी पदार्थ मी खाल्ले आहेत, सर्व छान आहेत. मुख्यत: “डमलिंगस” (भाज्यांचा मोदक हे मी दिलेले नाव) हा विशेष चांगला मिळतो, त्याबरोबची चटणी त्याला छान चव आणते.
दुसरी खासीयत म्हणजे, बसण्याची व्यवस्था.. छान मोकळ्या हवेचा आनंद घेत आपण भोजनाचा आनंद घेऊ शकतो. रस्त्यावरचा view फार सुरेख वाटतो. आणि service देखील उत्तम आहे. येथील prawns प्रसिद्ध आहेत  असे म्हणतात, पण मी खाल्ले नाहीत.

२. अप ऍंड अबव्ह: हे हॉटेल चांदणी चौकात, जरा टेकडीवर आहे. येथील खासीयत म्हणजे बसण्याची जागा. एकदम छान view आणि मस्त हवा. मला येथील जेवण फार नाही आवडले, पण मेथी आणि पालकच्या भाज्या आवडल्या. जर खाण्यापेक्षा गप्पांचा मूड असेल तर हे फार सुंदर ठिकाण आहे.

३. पंजाबी तडका: हे सुद्धा चांदणी चौकातच आहे. याची खासीयत जेवण आणि बसण्याची व्यवस्था. येथे भारतीय बैठक आहे, मधे एक टेबल आणि त्यावर कंदील लावलेला असतो. त्याच प्रकाशात जेवायचे. खूप सा‍र्‍या उशादेखील ठेवल्या आहेत, कसेही आरामात बसता येते. येथील “दाल मखनी” विशेष चांगली असते. गप्पा मारत छान जेवता येऊ शकते.

४. मोना फूडस : हे हॉटेल कॅंपमधे आहे. येथील “चना बटूरा” विशेष प्रसिद्ध आहे. इतरही पदार्थ येथे छान मिळतात. मला “पनीर काला मिरी” विशेष आवडते. येथे पुण्यातील १९०० च्या दरम्यानची चित्रे लावली आहेत.

–पल्लवी

Advertisements
  1. Punjabi Tadka has soiled and stained covers, very nauseating. We came back after seeing this.

    Up and Above as you rightly said is mainly for the nice view. Food is incidental but not bad. Service is good.

    No experience of other places you have written about. We shall try one of these days.

  2. Please try our new culinary venture: Grubshup at the intersection of Law College Road and Canal Road. Would like to know your comments. More details at http://www.grubshup.com or call me up.

    thx
    anil

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: