pallavikelkar

तार्‍यांचे बेट

In Marathi on April 25, 2011 at 9:43 am

एकता कपूर, शोभा कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या ऑल्ट एन्टरटेन्मेंट आणि नीरज पांडे, शीतल भाटीया यांच्या फ्रायडे वर्क्स ह्या निर्मिती संस्थांची संयुक्त निर्मिती असलेला “तार्‍यांचे बेट” हा मराठी चित्रपट कालच पाहिला.

किरण यज्ञोपवित दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन किरण यज्ञोपवित, सौरभ भावे, शैलेश दुपारे यांनी केले आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, शशांक शेंडे, जयवंत वाडकर ह्या मान्यवरांबरोबरच बालकलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एका लहानशा खेड्यामधे सुखा-समाधानानं राहाणारं, ग्रामपंचायीत काम करण्यार्‍या एका सामान्य माणसाचं कुटुंब. मुंबईदर्शन करताना चमचमतं पंचतारांकीत हॉटेल पाहून त्यात रहाण्याचा हट्ट करणारा व त्यासाठी पहिला येण्याची अट मान्य करणारा त्याचा मुलगा, याभोवती ही गोष्ट फिरत रहाते. अगदी रोजच्या आयुष्यात कोणाच्याही बाबतीत घडू शकणारी अशी ही गोष्ट आहे.
कथा छान आहे मात्र मुलाचा हट्ट पुरविण्यासाठी त्याच्या वडीलांना करावी लागणारी धडपड, त्यासाठी अनैतिक मार्ग अवलंबायचा निर्धार करून मग होणारी घालमेल याचे द्वंद्व अधिक प्रकर्षाने दाखविता आले असते. तो भाग मात्र फिका वाटतो. बाकी काही त्रुटी प्रेक्षक म्हणून मला तरी जाणवल्या नाहीत.
कोकणातींल सुंदर, निसर्गरम्य दृष्यांनी नटलेला हा चित्रपट, अगदी मनाला भिडेल असा आहे. सर्व कलाकारांनी सुरेख अभिनयाने ह्या गोष्टीतले सारे कंगोरे आपल्यापर्यंत पोहोचतात.
उत्तम व नेमक्या ठिकाणी गाणी, अवास्तवता नाही (एकता कपूरचा सिनेमा असूनही) यामुळे का चित्रपट भावतो. मोठ्यांबरोबरच लहान मुलांनीदेखील आवर्जून पहाण्यासारखा हा चित्रपट आहे.

(वरील चित्र येथून घेतले आहे.)

या आठवड्यात पाहिलेले आणखी एक उकृष्ट नाटक म्हणजे “वा गुरू”. याबद्दलही लवकरच लिहिणार आहे, याच आठवड्यात.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: